सोलापुरातील माजी महापौरासह चौघावर गुन्हा दाखल

Big9news Network

सोलापुरातील एका माजी महापौरांनी बनावट सातबारा उतारा तयार करून फसवणूक केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी अन्य तीन जणाविरुद्ध सदर बझार पोलीस (sadar bazar police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुखदेव भीमा राठोड, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव (ex mayor vittal karbasu jadhav) व त्या वेळचे तत्कालीन तलाठी ( talathi) व मंडल अधिकारी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सन २००४ ते २००७ या कालावधीमध्ये बनावट सातबारा उतारा खोटा आहे हे माहीत असताना देखील तो खरा आहे म्हणून वापर करून प्लॉटची खरेदी केली होती असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

सुखदेव राठोड व संशयित आरोपी विठ्ठल जाधव यांच्याकडून दस्त क्रमांक ६२६८/ २००४ प्रमाणे रजिस्टर खरेदी खत लिहून घेऊन विठ्ठल जाधव यांनी जागेच्या सातबारा स्वतःचे नाव लावून घेतले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.