Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

येथील मनविक फाउंडेशन च्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून अनाथाश्रम च्या मुलांना अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी दर्शन व एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते.प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही संस्कार संजीवनी अनाथाश्रम मुळेगाव येथील लहान मुलांना फाउंडेशन च्या वतीने याचे आयोजन केले होते.

सोलापूर मधील विविध अनाथाश्रम च्या मुलांना विविध सामाजिक संस्थेच्या व दातृत्वाच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातील व आजूबाजूला नळदुर्ग , रामलिंग ,कुंथलगिरी अश्या विविध ठिकाणी सहलीचे आयोजन करत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ मोनिका जिंदे यांनी सांगितले.

शिक्षण ,आरोग्य,सेवा ,अन्नदान या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनविक या संस्थेच्या माध्यमातून अश्या विविध उपक्रमाचे नियोजन समाजातील विविध घटकातील लोकांच्या प्रगती साठी करणार असल्याचे संस्थेचे सचिव प्रा विक्रमसिंह बायस यांनी सांगितले.आपल्या जिल्ह्यातील अक्कलकोट या तीर्थक्षेत्र ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व सेवा याचसोबत अक्कलकोट येथील महाराजांचे पॅलेस अश्या विविध ठिकाणी अनाथ मुलांनी भेटी दिल्या .या एकदिवसीय सहलीसाठी श्री राजेश वडीशेरला , श्री अतिष पवार ,श्री अंकुश चौगुले ,श्री परमेश्वर काळे ,श्रीमती सुरेखा बायस ,श्री चेतन जिंदे ,श्रीमती उज्वला जिंदे व श्री अक्षय जिंदे ,श्री अनिकेत सरवदे यांनी परिश्रम घेतले .तर या सहलीच्या नियोजन साठी श्री स्वप्नील काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *