गीतमंच उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंददायी होईल -CEO दिलीप स्वामी

MH13 NEWS Network
प्रत्येक आजार व समस्येवर संगीत हे परिणामकारक ठरत असून शाळा अन संगीत यांचे नाते अतूट आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत आनंददायी पद्धतीने गाणी तालासुरात म्हणण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शिक्षकांनी तयार केलेली ही ध्वनिफीत नक्कीच आनंददायी ठरेल” असे प्रतिपादन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले
येथील शिवरत्न सभागृहात मोहोळ तालुका गीतमंच विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ध्वनिफितीचे उदघाटन दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ किरण लोहार ,शिक्षणाधिकारी(माध्य) भास्करराव बाबर ,उपशिक्षणाधिकारी संजय जावीर,गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी,मल्हारी बनसोडे, बापूराव जमादार,विस्तार अधिकारी हरीश राऊत,सुहास गुरव,स्वाती स्वामी आदी उपस्थित होते

विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी प्रास्ताविक मधून या उपक्रमाविषयी माहिती दिली
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बोलताना ” कोरोना काळ व ऑनलाइन शिक्षणाच्या वातावरणात मुलांच्या मानस शास्त्राचा विचार करून हा उपक्रम घेतला आहे यामुळे शिकणे अन शिकवणे आनंददायी होईल” असे सांगितले.

प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभर गीतमंच चे प्रशिक्षण देण्यात आले होते शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही गाणी ताला सुरात संगीतबद्ध करून देण्यासाठी मोहोळ तालुक्यातील जि प शिक्षकांनी स्वखर्चाने यामधील सर्व गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत ती आता प्रत्येक शाळेत पोहोचणार आहेत
या गीतमंच साठी मोहोळ तालुका गीतमंच विभाग प्रमुख रुपेश क्षीरसागर(तबला) अण्णा सुरवसे ( हार्मोनियम) यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत मते,प्रफुल्ल शेटे,महेश मेत्री,किरणकुमारी गायकवाड, अलका भालेकर, वनिता कमळे,अरुंधती सलगर,अनुराधा केवळे, आशा प्रक्षाळे ,अमोलिका जाधव यांनी गायन केले

या गीतांसाठी निवेदन विस्तार अधिकारी स्वाती स्वामी व मोहोळ तालुक्यातील शिक्षक महेश कोटीवाले यांनी केले
गीतमंच यामध्ये एकूण ३१ गाणी संगीतबद्ध केली असून यामध्ये प्रार्थना, समुहगीत, स्फूर्तिगीत, स्वागतगीत यांचा समावेश आहे

सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले आभार विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी मानले