गुळवंची येथे दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप

सोलापूर- गुळवंची ग्रामपंचायत च्या हद्दीतील सर्व नोंदीत दिव्यांग बांधवांना शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग बांधवांना 5 % निधी चे वाटप सरपंच विष्णू नानासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या स्वनिधीतून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे शासकीय धोरण आहे.या धोरणानुसार गुळवंची ग्रामपंचायतीने निधीचे वाटप केले. गुळवंची गावातील एकूण 16 दिव्यांग बांधवांची ग्रामपंचायत कडे नोंद असून प्रत्येक दिव्यांग बांधवास 1000 रुपयाच्या चेक चे वितरण करण्यात आले. कोरोना महामारी च्या काळात ग्रामपंचायत ने दिलेल्या निधीमुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मोलाची मदत झाली आहे.

गावातील अन्य दिव्यांग बांधव ज्यांच्याकडे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा ज्या दिव्यांग बांधवाकडे प्रमाणपत्र नाही त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र काढून त्यांनी ग्रामपंचायत कडे आपली नोंदणी करून घ्यावी येणाऱ्या आर्थिक वर्षात त्यांना देखील दिव्यांग निधी देण्यात येईल असे सरपंच विष्णू भोसले यांनी सांगितले.

यावेळी ग्रामसेविका मनिषा शिंदे उपसरपंच सागर राठोड,राष्ट्रवादी दिव्यांग सेल चे प्रदेश उपाध्यक्ष धनाजी भोसले, विष्णू पवार, अकबर सय्यद, हणमंत जगताप, कचुर सय्यद आदी लाभार्थी उपस्थित होते.