Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर विभाग मधील गाडी क्रमांक 01157/01158 पूणे-सोलापूर-पूणे एक्सप्रेस विशेष गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मंडल रेल प्रबंधक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सोलापूर विभागातील भालवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शन मध्ये दुहेरीकरण काम वेगात सुरू आहे.या मार्गावरील चालू असलेले कार्य प्रगतीपथावर आहे. यांची देखभाल दुरुस्तीसाठी आणि दुहेरीकरणाच्या कार्यासाठी घेण्यात येणा‌-या इजिनियरिंग ब्लॉकमुळे खालील विशेष मेल एक्सप्रेस गाड्या यात्रा प्रारंभ दिनांक 19.07.2021 ते 31.08.2021 पर्यत रद्द करण्यात आल्या आहेत.


• रद्द केलेल्या विशेष एक्सप्रेस गाड्या
1. गाडी क्र. 01157 पुणे-सोलापूर विशेष एक्सप्रेस (आठवड्यात पाच दिवस) ही यात्रा प्रारंभ दिनांक 19.07.2021 ते 31.08.2021 दरम्यान रद्द.
2. गाडी क्र. 01158 सोलापूर-पुणे विशेष एक्सप्रेस(आठवड्यात पाच दिवस) ही यात्रा प्रारंभ दिनांक 19.07.2021 ते 31.08.2021 दरम्यान रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *