Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

पुणे : ओळखीतून प्रेम झाल्यानंतर मुलीच्या प्रेमसंबंधामुळे तिच्या आईवडिलांनी कोट्यावधी खर्च करुन तिचा विवाह लावून दिला.विवाहानंतर पतीने अमेरिकेत बोलावून घेऊन तरुणीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.शेवटी तरुणीने अमेरिकन पोलिसांच्या मदतीने स्व: तची सुटका करुन घेतली. त्यानंतर आता ही नवविवाहिता पुण्यात आल्यावर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
धर्मांतरासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तरुणीच्या पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी पुण्यातील विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. लव शर्मा आणि तरुणी एकाच कंपनीत नोकरी करत होती. तेथे त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. मुलीच्या हट्टामुळे तिच्या आई-वडिलांनी लाखो रुपये खर्च करून विवाह करून दिला.

 

या प्रकरणी पती लव अरुण वर्मा, दीर कुश अरुण वर्मा, परवीन अरुण वर्मा, विधू वर्मा, डॅनियल वर्मा आणि अरुण वर्मा (सर्व रा. खारघर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *