अभिमानास्पद| वय अवघे 7 वर्षे3 महिने, निर्माण केला विश्वविक्रम ; वाचा सविस्तर

विश्वविक्रमवीर चि. कुशाग्र हर्षद वागज यांचा सोलापूर मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कुशाग्रवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

युरोप खंडातील रशियामध्ये असलेल्या सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट उंच आहे. या शिखरावर निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहेत. तापमान उणे २५ अंश सेल्सिअस असते. वर्षभर सतत मोठं मोठी वादळे होतात. चढाईतील या अडचणी पार करत चि कुशाग्र हर्षद वागज यांनी अवघ्या ७ वर्षे ३ महिने वयात विश्वविक्रम प्रस्थापित केले. या पुर्वी अमेरिकाच्या आठ वर्षे वयोगटाचा विश्वविक्रम मोडीत काढून सोलापूरच्या या चिमुकल्यांनी विश्वविक्रम केला. एलब्रूस शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून गारद आळवला. शिवप्रतीमेचा ध्वज फडकवला या विश्वविक्रमविराचा सोलापूर मध्ये मराठा सेवा संघ सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राम गायकवाड यांच्या हस्ते शिवस्वागत करण्यात आले.


शिवराय जन्मावेत दुसऱ्याच्या घरात अशी वृत्ती बळावत असताना डॉ हर्षद वागज यांनी अवघ्या सात वर्षांच्या मुलास अशा जोखमीच्या शिखरावर पाठवण्याच धाडस दाखवले आहे. ते कौतुकास्पद आणि आजच्या पालकांना दिशादर्शक आहे. कुशाग्रनी जे विश्वविक्रम प्रस्थापित केले आहे त्याचा एक सोलापूरकर म्हणून अभिमान वाटतो असे मत राम गायकवाड यांनी व्यक्त केले.

चि. कुशाग्र वागज याचे मार्गदर्शक एव्हरेस्टवीर आनंदजी बनसोडे , कुशाग्रचे पिता डॉ हर्षद वागज यांचा ही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सतिश कदम, धैर्यशील कावळे, सागर बोधले, अतुल सोनके, शिवेंद्र गायकवाड, ओंकार मुळे आदी उपस्थित होते.