मोठी बातमी | राज्यात लॉकडाऊनची शक्यता ; मुख्यमंत्र्यांचे संकेत

MH13 News Network

गेल्या वर्षाचा अनुभव भयानक आहे, राज्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले. त्यासंदर्भात बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणीही केली आहे. गेल्या दोन तासापासून यावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळी या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित आहेत .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेच आहे, परंतु यंदाच्या लोकांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. जवळपास पंधरा दिवस कडक लोक डाऊन होऊ शकतो असे सूतोवाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

मागच्यावेळी ताट आणि दिवे करण्यात आले तेव्हाही लोकांनी पाठिंबा दिला होता. गेल्या वेळेस वीस लाख कोटी ची घोषणा करण्यात आली होती परंतु त्याचा छदामही देण्यात आला नाही अशीही खोचक टीका नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
केंद्राने मोठे पाप केले, लसीकरणासाठी रेशनिंग लावले ,भाजपा नसलेल्या राज्यात कमी लसी देण्यात आल्या.

मुख्यमंत्री तुम्ही निर्णय घ्या असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत म्हटले आहे. जनतेच्या जीवासाठी जो महत्त्वाचा निर्णय आहे तो होणे गरजेचे आहे असाच सूर बैठकीत निघाला. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी कडक लॉकडाऊनला पाठिंबा दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.