शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी:
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत असुन काही आरोग्य तज्ञांच्या मते काही दिवसात कोरोनाची तिसरी लाठ येण्याची शक्यता वर्तवली आहे,त्यामुळे देशासह महाराष्ट्रासाठी हे चिंतेचे आहे,त्यामुळे नागरिकांनी शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्यासाठी मदत करावी असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी देत आहे . सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक होत असुन आज दिनांक 10 एप्रिल शनिवार माढा तालुक्यात 150 नवीन रूग्णाची वाढ झाली आहे.तालुक्यातील या गावात रूग्ण वाढ झाली आहे –
माढा -6, कुर्डुवाडी 14,टेंभुर्णी 23, मोडनिंब 9, तुळशी 13, परिते 20, कव्हे 2,भोसरे 3, रोपळे खु 1, चिंचगाव 1, रोपळे 2,वेताळवाडी 1, उपळाई बु1, बैरागवाडी 3, भुताष्टे 2,अरण 6, पडसाळी 1, बावी 3 सोलंकरवाडी 1,भेंड 3, आहेरगाव 1, कुर्डु 1, अंबाड 7, पिंपळनेर 1, रांझणी 6, दहीवली 3, सुर्ली 2, अकोले बु. 5 , शेवरे1, कन्हेरगाव 2, आलेगाव बु.1आलेगाव खु.2, पिंपळखुंटे 1, म्हैसगाव 2, रुग्णालयातून बरे होऊन 67 जण घरी परतले आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी सांगितले. त्याच बरोबर नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे व धोका कोरोनाचा टाळावा. असे आवाहन केले आहे.
Leave a Reply