Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूची दुसरी लाटेत झपाट्याने रूग्ण वाढ होत आहे या गोष्टी टाळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाचा प्रकोप टाळावा असे आवाहन वारंवार प्रशासनाकडुन केले जात आहे. आज माढा तालुक्यात 57 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे . तर रुग्णालयातून बरे होऊन 18 जण घरी परतले आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी सांगितले.

त्याच बरोबर नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे व धोका टाळावा त्याचबरोबर नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

आज दिनांक 30/3/2021 वार मंगळवार या गावातील रूग्ण वाढ झाली आहे – माढा 1, कुर्डुवाडी 14, टेंभुर्णी 11, तांदुळवाडी 3, मानेगाव 1, पापनस 1, बिटरगाव 1, जाधववाडी मो 4, बावी 5, भेंड 2, भोसरे 1, जाखले 1, मोडनिंब 3, अकोले खु 1, कन्हेरगाव 3, घोटी 1, तुळशी 1, लऊळ 1, अरण 1, चिंचोली 1, तालुक्यातील या गावात रूग्ण वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *