सोलापुरात आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक ; समितीची मागणी

सोलापूर – निराळे वस्ती मधील बगिचा परिसरात कै.आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक तसेच माहितीपर कोनशिला बसविणे कामीचा येणाऱ्या सभागृहा समोर मांडावा असा प्रस्ताव कै.आण्णासाहेब पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव व कार्याध्यक्ष किरण पवार यांनी सभागृहनेते शिवानंद पाटील यांना दिला.

कै.आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम आरक्षणासाठी लढा कष्टकरी व गोरगरीब कामगारांसाठी, माथाडी कामगार संघटना स्थापन करुन अठरापगड जातीच्या कामगारांना न्याय मिळवून दिला. अशा थोर व्यक्तीचे स्मरण व्हावे, त्यांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरावेत, या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या मालकी हक्काची जागा, निराळे वस्तीच्या बाजुला मोकळी जागा असून तेथे कै.आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक व त्यांच्या कार्याचे शिल्पकृतीव्दारे माहितीपर कोनशिला बसविन्याची निंतात गरजेचे वाटते. त्यासाठी दि. १३ जुलै २०२० रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभैय्या जाधव व किरण पवार यांच्यावतीने प्रशासनाला कै.आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाची मागणी केलेली आहे.

जर सोलापुरात कै.आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक बांधले तर ते एक उभ्या महाराष्ट्रात ऐतिहासीक व सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी घटना होईल. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम स्मारक उभारण्याचे भाग्य व मान सोलापुरकरांना प्राप्त होईल. याचा सार्थ अभिमान संपूर्ण सोलापुरकरांना वाटेल . तरी निराळे वस्ती मधील माटे बगिचा परिसरात कै.आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक तसेच माहितीपर कोनशिला बसविणेकामीचा प्रस्ताव कै.आण्णासाहेब पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष राम जाधव व कार्याध्यक्ष किरण पवार यांनी दिली.

यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदीजन उपस्थित होते.