सोलापुरातील मित्र नगर परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलाने आईचा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबाबत संशयित आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.
सोलापुरातील मित्र नगर परिसरात राहणाऱ्या वंदना एकनाथ कोळेकर वय वर्ष 48 यांच्या कपाळावर, डोक्यावर लोखंडी फुकारी मारून खून झाल्याची घटना काल रात्री दीडच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मयत वंदना कोळेकर यांचा मुलगा अतुल कोळेकर वय वर्ष 28 मित्र नगर शेळगी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे
डोक्यावर कपाळावर जबर जखमा झाल्याने जागेवरच मृत्यू पावल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलिस अधिकारी जमा झाले आहेत.
या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे.