Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज व ऍग्रीकल्चर
सोमवार दि १२.०४.२०२१ रोजी बिगर अत्यावश्यक (Non Essential वस्तूची) दुकाने न उघडण्याबाबत सोलापूर
चेंबरचे आवाहन…

प्रति,सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व संलग्न संघटना पदाधिकारी व व्यापारी बंधू,मा.मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आज रविवार दि. ११.०४.२०२१ झालेल्या त्यांच्या टास्क फोर्सच्या मिटिंगमद्धे सर्व बाबींचा उहापोह करण्यात आला. नंतर मुख्यमंत्री महोदय याबाबतचा निर्णय उद्या सोमवार दि ११.०० वाजता मिटींग घेऊन महाराष्ट्र राज्यात कोविड १९ महामारीच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याबाबत राज्यात संपूर्ण Lock Down बाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केलेले आहे.त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत बिगर अत्यावश्यक वस्तू चे (Non Essential) व्यापाऱ्यांची दुकाने उघडू नयेत. जेणेकरून “Disaster Management Act 2005 अंतर्गत कठोर कारवाईचा धोका पत्करू नये, असा सोलापूर चेम्बरचे कोअर कमिटीने निर्णय घेतला आहे.प्रशासनानेही कायद्याचा भंग करू नये अशा स्वरूपाचे आवाहन केले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून आपले राज्यस्तरीय शिखर संघटनाचे(CAMIT) चे चेअरमन श्री मोहन गुरूनानी,अध्यक्ष श्री दीपेन अग्रवाल यांचे निर्देशानुसार आपण सोमवार दि १२.०४.२०२१ रोजी मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्णयाची वाट पाहून पुढील भूमिका घेणेच योग्य ठरेल असे कळविले आहे.

तरी आपण मुख्यमंत्री यांचा निर्णय येईपर्यंत आपली दुकाने उघडण्याची घाई करून स्थानिक प्रशासना कडून वरील कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाईचा धोका पत्करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच दिनांक ४/४/२०२१ चा सध्या मिनी लाॅक डाऊन आदेश लागू आहे . त्यात अत्यावश्यक दुकाने व सेवा सोडून इतर सर्व दुकान बंद असल्याने त्यात कोणताही बदल अथवा सुधारित आदेश नाहीत.
या उपरांत व्यापारी बांधवांनी स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवर दुकाने उघडण्याचा निर्णय घ्यावा. असेही त्या आवाहन मध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *