Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13NEWS Network

माढ्यात चक्का जाम आंदोलन करून आरक्षण प्रश्न तातडीने सोडविण्याची मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

माढा प्रतिनिधी:- नुकत्याच दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबिसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने माढा शहरात अखिल भारतीय समता परिषद व ओबिसी आरक्षण संघर्ष समिती माढा शहर यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक 6 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करीत चक्का जाम आंदोलन केले.यावेळी महापुरूषांच्या जयघोषाने व ओबीसींच्या आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिरसकर पश्चिम विभाग प्रमुख कुंडलिक माळी रामहारी वहील नगरसेवक चंद्रशेखर गोटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिनेश गाडेकर यांनी उपस्थित समाजबाधवांना संबधित केले.ओबिसी आयोग नेमून इमपेरिकल डाटा तातडीने जमा करून न्यायालयाकडे सुपूर्द करावा .आरक्षण स्थगिती उठेपर्यत कोणत्याही निवडणूका घेऊ नयेत .स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे लोकसभा व विधानसभेत ओबीसींना आरक्षण सुरू करावे .एससी एसटी चे पदोन्नतीतील बंद केलेले आरक्षण सुरू करावे.या मागण्या करतानाच लवकरात लवकर यावरती कार्यवाही नाही झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
केंद्र व राज्य सरकार या आरक्षण विषयावरून राजकारण करत असून सकल ओबिसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.सर्वच पक्षात ओबिसी कार्यकर्ते असले तरी आरक्षण या मुद्द्यावर सर्वांचा एकच पक्ष असून तो प्रश्न मार्गी लावणारा पक्ष आमचा अशी ताठर भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या आंदोलनास मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे यांचेसह माजी उपसरपंच राजेंद्र चवरे रिपब्लिकन पक्षाचे अशोक माने डाॅ यु एफ जानराव राष्ट्रीय समाज पक्षाचे गोरक वाकडे भाजपाचे विजयकुमार महासागर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिनेश गाडेकर व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.

महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात सकल ओबिसी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.गेली अनेक वर्षानंतर ओबिसी समाज आक्रमक रित्या रस्त्यावर उतरलेला पहायला मिळाला.ओबिसी समाजातील शहर व परिसरातील प्रत्येक समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यामध्ये नगरसेवक चंद्रशेखर गोटे डाॅ हणुमंत क्षीरसागर प्रमोद वेदपाठक निलेश बंडगर गोरक वाकडे शिवाजी माने राजाराम देवकर भैय्या खरात धोंडीराम राऊत डाॅ श्रीकांत वाळके रविंद्र कथले शैलेश कुर्डे सोमनाथ गोसावी संदीप खारे हनुमंत भोसले हनुमंत राऊत अनिल साळुंखे आकाश मोरे बाबूलभाई बागवान धनाजी वसेकर गंगाराम पवार राहुल लंकेश्वर शिवाजी माने पांडुरंग पुजारी जोतीराम घाडगे राजेंद्र राऊत लक्ष्मण माने आदिंसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
मंडल अधिकारी सोनवणे व जेलर गणेश खैरे यांनी निवेदन स्विकारले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुआ यांनी यावेळी चोख बंदोबस्त लावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *