Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9News Network

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी, या संदर्भात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त याची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील,यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख नगरसेवक नागेश भोगडे आदी उपस्थित होते.महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चेनंतर त्यानंतर यात्रे संदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात आले.

देशभरात दिवसेंदिवस राज्यभरात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच ,यंदाच्या वर्षी सिध्देश्वर यात्रे करिता परवानगी प्रशासनाने सिद्धेश्वर यात्रेत मानाच्या नदीध्वज आणि मोजक्या मानक-यासह यात्रेचे विधीवत सोपस्कार पुर्ण करण्यासाठी परवानगी घ्यावी ,तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी मागणी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी महापौर कार्यालयात पालिका आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली.नंदीध्वजसह मानाचे मानक-यासह यंदाच्या यात्रेस परवानगी मागितली आहे अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बु यांनी दिली.

मागील वर्षीप्रमाणे यात्रेला परवानगी मिळणार आहेच पण यंदाच्यावर्षी नंदीध्वज आणि मानक-यास यात्रेत परवानगी प्रशासनाने द्यावी म्हणून चर्चा केली आयुक्त नक्कीच सकारात्मक विचार करतील असा विश्वास यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. खासदार आमदार आणि पालिका आयुक्तां सोबत यात्रेच्या परवानगी करता चर्चा झाली असून त्यानंतर,जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त,यांच्या बरोबर सुध्दा चर्चा झाली असून सकारात्मक विचार करतील असा विश्वास महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *