Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर, दि. २४ : बार्शीतील शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बार्शी येथे दिल्या. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

बार्शी तालुक्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. बार्शी नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे यांनी बार्शी शहर आणि परिसरातील कोरोना परिस्थिती, उपलब्ध बेड संख्या, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिव्हीर इंजेक्शन पुरवठा, लसीकरण मोहीम म याचा आढावा घेतला.

बार्शी येथे बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. मात्र या सर्व रुग्णांना बार्शीत उपचार देता यावेत यासाठी प्रयत्न करायला हवा. बार्शीत होम आयसोलेशन ऐवजी जास्तीत जास्त रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात यावा. त्यासाठीची प्राथमिक तयारी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, मुख्याधिकारी अमिता दगडे, वैद्यकीय अधीक्षिका शीतल बोपलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, नोडल अधिकारी डॉ. पवन गुंड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *