Breaking | चोरट्यांनी फोडले मेडिकल शॉप ; मार्केटयार्ड परिसरातील घटना

चोरट्यांनी फोडले मेडिकल शॉप ; मार्केटयार्ड परिसरातील घटना

सोलापुरात आज सकाळी मार्केट यार्ड परिसरातील एक मेडिकल आणि जनरल स्टोअर्स चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.सोमवारी दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.


शहर परिसरातील हैदराबाद रोड वरील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या जय मेडिकल आणि जनरल स्टोअर्स हे दुकान चोरट्यांनी कुलूप तोडून फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यात असलेली चिल्लर घेऊन पोबारा केला.

याबाबत दुकानचे मालक बाहुबली शहा यांनी माहिती देताना सांगितले की, चोरट्यांनी ड्रॉवर उघडून दोन व पाच रुपयाचे नाणे असलेले जवळपास चारशे रुपयाची चिल्लर घेऊन गेले आहेत. ड्रॉवरमध्ये फाईल आणि औषधे होती ती तशीच आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
या दुकानांमध्ये सीसीटीव्ही असून त्याचीही माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मार्केट यार्ड परिसरात मागील चार ते पाच महिन्यात दुकाने फोडण्याचे सत्र सुरू आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी वर्गामधून होत आहे.