Big9News Network
(सेलू) सेलू नगर पालिकेने तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणी करीता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तात्काळ जागा उपलब्ध करून सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हे क्रीडा संकुल अत्याधुनिक सुविधेसह भव्य व वैभवशाली करण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत केंद्रशासनाचा निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले.
येथील तालुका क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन समारंभात रविवार ता. १५ रोजी आ. मेघना साकोरे (बोर्डीकर) कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.बाबाजानी दुर्रानी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, तहसीलदार बालाजी शेवाळे,कृउबाचे मुख्य प्रशासक रंजीत गजमल,, पो.नि.सरला गाडेकर, राज्य शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. यु.डी.इंगळे,प्रा.डॉ.माधव शेजुळ,क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम, गटशिक्षणाधिकारी गनराज यरमळ, तालुका क्रीडा अधिकारी संजय मुंडे,कैलास माने,नानासाहेब राऊत,चंद्रशेखर नावाडे, दिपक कुपटीकर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतुन प्रवेशद्वार, बहुउपयोगी क्रीडाहॉल, कबड्डी ची मैदाने ही कामे केली जातील अशी माहिती दिली. उद्योजक जयप्रकाश बिहाणी, डॉ. संजय रोडगे, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, मनिष कदम आदी प्रतिष्ठीत उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी डी सोन्नेकर तर प्र.तालुका क्रीडा अधिकारी संजय मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, गिरीश लोडाया, प्रा.के के कदम,प्रा नागेश कान्हेकर,दिलीप सुरवसे, मुख्याध्यापक, सर्जेराव लहाने, प्रदीप कौसडीकर, राजाभाऊ चव्हाण, सुभाष मोहकरे, महादेव खरात, सुनील गायकवाड, किशोर ढोके, सर्व क्रीडा शिक्षक, न.प. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शासनाने क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर केला परंतु जागे अभावी अडचणी येत होत्या हे लक्षात घेऊन
सेलू तालुक्यातील क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी व खेळाडूंना दर्जेदार सुविधा , प्रशिक्षण मिळावे म्हणून सेलू नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे.
नगराध्यक्ष : विनोद बोराडे
जलतरणीकेसाठी निधी देऊ
क्रीडा संकुलामुळे सेलू शहर हे शिक्षणाबरोबर खेळाचेही माहेरघर होईल,ग्रामीण भागातील गुणवत्तेतुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील व त्यांना नोकरी च्या संधी मिळतील, त्या बरोबर येथे जलतरणीकेसाठी उभारणी साठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्ष विनोद बोराडेंना सहकार्य करू अशी ग्वाही आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.
आमदार बाबाजानी दुर्रानी