Big9news Network
सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 23 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
सोलापूर शहरात आज सोमवारी दि.19 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 436 रुग्ण आढळले असून यामध्ये 249 पुरुष तर 187 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 2895 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2459 निगेटीव्ह तर 436 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 342 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 23 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.