शटरडाऊन @7 | अफवांवर विश्वास नको ; दुकाने ‘सात’ला बंद

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुळे 25-3-2021 ला महापालिका कडून शहरातील सर्व दुकाने हे 7 वाजता बंद होतील असे आदेश काढण्यात आले होते.

काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढलेल्या नवीन आदेशानुसार रात्री 8 वाजल्या पासून जमाव बंदी राहिल असा आदेश असून महापालिका व शासनाचे दोन्ही वेगळे आदेश आहेत. काल पासून शहरामध्ये दुकाने हे 8 पर्यत सुरू राहतील असे अफवा पसरवले जात आहे.तरी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व दुकाने हे रात्री 7 वाजेपर्यंत सुरू राहतील व महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढलेल्या नवीन आदेशानुसार रात्री 8 वाजल्या पासून जमाव बंदी राहिल अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिले.

25 मार्च रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीत चालू राहतील. तथापि अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रा साठी जीवनावश्यक वस्तू,भाजीपाला, फळे,किराणा व दूध व वृत्तपत्र वितरण याबाबत हा आदेश लागू राहणार नाही. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील .शहरातील दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीतच सुरू राहतील.