चिंता वाढतेय | सोलापूर शहरात नव्याने 239 ‘पॉझिटिव्ह’ ; दोन जणांचा मृत्यू

0
275

MH13 News Network 

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज मंगळवारी दि. 30 मार्च रोजी कोरोनाचे नवे 239 रुग्ण आढळले असून यामध्ये 141 पुरुष तर 98 स्त्रियांचा समावेश आहे.

आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1418 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1179 निगेटीव्ह तर 239 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 153 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.