सावधान ! Sim swapping होऊ शकते आपल्यासोबत ; अशी घ्या काळजी ..

सावधान..!! Sim swapping हा प्रकार कोणत्याही मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीसोबत होऊ शकतो. त्यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते.

याबाबत सोलापुरातील प्रसिद्ध सायबर क्राईम बाबत तज्ञ  ॲड.मंजुनाथ कक्कळमेली सांगताहेत..
आज सकाळी माझ्या सोबत घडलेला किस्सा , सकाळी उठल्यावर मेसेज बॉक्स मध्ये खालील प्रकारे मेसेज दिसून आला, मी तत्काळ समजलो हा सिम swapping चा प्रकार असू शकतो.
तरी आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण अशी काळजी घेतली पाहिजे.

आपल्याला जर खालील प्रकारे कुठल्याही अनोळखी मोबाईल न. वरून खालील पदधतीचे मेसेज/कॉल जर येत असतील तर त्याला प्रतिसाद देऊ नका.
हा एक सिम swapping चा प्रकार आहे.
सायबर हॅकर्स/गुन्हेगार आपल्याला अश्या अनोळखी न. वरून मेसेज पाठवून आपला सिम expire झालेला आहे तरी आपण २४ तासाच्या आत आपले कागदोपत्रे पूर्तेतेसाठी खालील न. वर संपर्क साधून करावा.


काय करावे…-
१) अश्या आशयाचे मेसेज जर आपल्या न. वर येत असतील तर त्याला प्रतिसाद देऊ नका.

२) आपल्या सर्व्हिस provider कंपनीशी/ आपल्या मोबाईल कंपनीशी संपर्क साधून खात्री करावी.
अनोळखी मोबाईल न. वरून कॉल किंवा मेसेज आले तर त्याला प्रतिसाद किंवा कसल्याही पद्वतीने आपले वयक्तिक माहिती देऊ नये.
३) कुठल्याही सर्व्हिस provider आपले मोबाईल नंबर कुठल्याही कारणास्तव तुम्हाला कॉल करून details मागत नाहीत.
४) कुठलीही कंपनी आपल्याला फक्त २४ तासाची मुदत कधीच देत नाही.

वैयक्तिक माहिती दिली तर काय होईल..?

१) माहिती दिली तर आपल्याच मोबाईल नंबरचा वापर करून आपल्या बँक खाती मधून पैसे चोरू शकतात.

२) सिम स्वॅप केलेला मोबाईल नंबर जिथे कुठे आपण रजिस्टर केलेला आहात, त्या सर्व बँक खाती, email, what’s app, twitter हॅक होऊ शकतो.

ॲड. मंजुनाथ कक्कळमेली