महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटच्या टॉपटेन सिटीत आता सोलापूर

सोलापूर,दि.२ : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील दहा शहरात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश आहे. (Solapur now in Topten City of Corona Hotspot in Maharashtra)

कोरोनाच्या विषाणूंचा कहर कायम आहे. महाराष्ट्रातील टॉपटेन हॉटस्पॉट शहराची नावे समोर आली असून त्यात सोलापूरचा समावेश आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, जळगावनंतर सोलापूरचा क्रमांक आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात ५ हजार ९८५ रूग्ण बाधित असून त्यांच्या विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात ८ लाख १९ हजार ८२० संशयित, ६२ हजार ३९२ बाधित रूग्ण तर उपचारानंतर ५४ हजार ३७६ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  ग्रामीण भागातील बाधीत रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार १ झाली आहे. यापैकी ४१ हजार ४७५ जण बरे झाले आहेत. अद्यापही ३ हजार २८९ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १२३७ झाली आहे. शहरातील बाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ३९१ झाली आहे. यापैकी १२ हजार ९०१ जण बरे झाले आहेत. अद्यापही २ हजार ७५९ जण बरे झाले आहेत. मृतांची एकूण संख्या ७३१ झाली आहे.

वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातील दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर हद्द वगळून जिल्ह्यात शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.