MH13 News Network
आज दि.9 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 741 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज शुक्रवारी 9 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 741 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 475 पुरुष तर 266
महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 418 आहे. यामध्ये पुरुष 260 तर 158 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 7056 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6315 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.