महेश हणमे/9890440480
कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेट नुसार राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार स्तर (३)चे निर्बंध लागू या आधीच लागू झालेले आहेत. LEVEL 3 मध्ये सोलापूरचा समावेश होत असल्याने आदेशात कोणतेच नवे बदल नाहीत.आधीप्रमाणेच आदेश लागू असतील अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
असे आहेत नियम…
- शहरातील अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी.
सोमवार ते शुक्रवार या दिवसात दुपारी 4 पर्यंत खुली ठेवता येतील.
शनिवारी-रविवारी अत्यावश्यक नसणारी दुकाने बंद राहतील .
उद्या सोमवार दि. 26 जुलै पासून नवीन आदेश येईपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहतील
काय आहे शहराची सद्यस्थिती …
सोलापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 2.07 % इतका कमी झालेला आहे. तर ॲक्टिव्ह पेशंट संख्या 110 इतकी आहे. यामध्ये 52 पुरुष आणि 58 महिलांचा समावेश होतो.
शहरातील रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या: 5.82 % इतकी आहे.
शहरात शुक्रवारपासूनच व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच काहींनी व्हाट्सअप द्वारे शनिवारी -रविवारी दुकाने बंद असून सोमवार पासून वेळेत बदल होणार असल्याची माहिती व्हायरल केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांनी पुणे मध्ये सायंकाळी सात पर्यंत दुकान सुरू ठेवण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल असं वक्तव्य केलं होतं.