पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोना ‘पॉझिटिव्ह’

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या धडाकेबाज पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोनाची लागण झाली आहे. सातपुते यांनी स्वतःहून सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ट्वीट करून स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे
ट्विटर वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की तपासणी केली असता मला कोरोना असल्याचे निदान झाले आहे. मागील तीन-चार दिवसात जे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी सध्या मी कोणाचे उपचार घेत आहे तोवर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.