Video |तालिबानीच्या दहशतीमुळे देशाबाहेर पडण्यासाठी मोठी गर्दी

अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. तालिबानने अफगाणिस्थान काबीज केले असून त्यामुळे तिथे नागरिक भीतीच्या सावटाखाली असून देशाच्या बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र प्रसारमाध्यमांमधून झळकत आहे.

देशातून बाहेर पडण्यासाठी विमानात प्रचंड गर्दी होत आहे.
काही लोक विमानाच्या पंख्यावर ही बसले आहेत. आपल्याकडील एसटी ,रेल्वे प्रमाणे प्रचंड गर्दीचे चित्र निर्माण झाले आहे .उडत्या विमानातून काही जण खाली पडले. सध्या काही वृत्तवाहिन्यांवर हे दाखवलं जात आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या रेटारेटी मुळे पाच जण मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.