Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big 9 News Network

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मृत्यूचे थैमान,बेडची कमतरता, ऑक्सिजन संपलेले, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही तर हॉस्पिटल हाउसफुल झाले आहेत.
वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील 100 गावात कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामींनी दिल्या.

सीईओ स्वामी यांच्या या पॅटर्नमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल. गावातच आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या ठिकाणी अथवा शहरात येणारा रुग्णांचा लोंढा थांबेल.

तालुका निहाय गावाची संख्या

अक्कलकोट 6 बार्शी 5 करमाळा 5 कुर्डूवाडी 9 मोहोळ 8 मंगळवेढा 3 माळशिरस 19 पंढरपूर 21 सांगोला 10 दक्षिण सोलापूर 9 उत्तर सोलापूर 5

शहर परिसरात ५० बेडचे ऑक्सिजनची सोय असलेले सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.यासाठी नेहरू वसतिगृहाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध झाल्यास तातडीने कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याचेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.

पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत आढावा घेऊन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायत स्तरावर गाव तिथे covid केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सुयोग्य असे सार्वजनिक ठिकाण निश्चित करून निश्चित करून 25 ते 50 क्षमतेच्या खाटांची क्षमता असलेले कोविड सेंटर दोन दिवसात सुरू करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना आदेश दिलेला आहे. कुर्डूवाडी तालुक्यातील नऊ ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभे केले जाईल.
दिलीप स्वामी,

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *