Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून 
सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी सहा
बायपॅप मशीन  
सोलापूर- ( प्रतिनिधी ) – कोरोनाने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. अनेकांना याच कोरोनाने हिरावूनसुद्धा  घेतले. ज्यांना वैद्यकीय उपचार मिळाले ते कसेबसे तरले. ज्यांना कोरोनाशी सामना करताना वैद्यकीय उपचाराशी झगडावे लागले, त्यांना मात्र दुःखाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. केवळ आणि केवळ वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे हकनाक बळी गेले.कोरोनाने थेट माणसाच्या श्वासालाच घेरल्यामुळे आणि त्यासाठी लागणारी उपकरणे वेळेत मिळू न शकल्याने अनेकांचे बळीसुद्धा गेले. त्यातच आता तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून या लाटेचा लहान मुलांना होणार धोका लक्षात घेता. सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
दरम्यान युवा सेनेचे प्रमुख व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हीच  गरज ओळखून व त्याच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने राज्यातील पुणे,सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण ४४ बायपॅप मशीन ( मिनी व्हेंटिलेटर ) उपलब्ध केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी ६ मशीन पुणे विभागाच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याकडून  सिव्हिल सर्जन यांच्याकडे आल्या आहेत. त्यातील २ मशीन सोलापूर महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत.पंढरपूरला २ व माळशिरससाठी २ मशीन देण्यात आल्या आहेत. सोलापूर महापालिकेला देण्यात आलेल्या मशीन सोलापूर युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या उपस्थितीत महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी चौगुले,अमर बोडा,योगेश भोसले,शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे,गणेश सुरवसे,अमितकुमार गडगी,सय्यद वसीम,अभिषेक दुडका,विनोद घोडके यांच्यासह कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप, अरुण जाधव आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक उपकरणांची गरज पूर्ण


सोलापूरला कोरोनाने अक्षरशः हैराण केले. या कालावधीत अत्याधुनिक उपकरणांची कमतरता जाणवत होती. याबाबत युवा सेनेचे प्रमुख व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने दखल घेत तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरसाठी अत्याधुनिक अशा सहा बायपॅप मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे सोलापूरकरांना आरोग्याच्यादृष्टीने मोठा हातभार लागला आहे. युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सोलापूर संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे सदरच्या मशीन वेळेत प्रशासनाला मिळण्यास मदत झाली.

विठ्ठल वानकर – 

    युवा सेनेचे शहर प्रमुख 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *