MH13 News Network
बाळे गावातील खेळाडूंसाठी दरवर्षी प्रमाणे * BPL अर्थात बाळे प्रीमियर लीग* ही स्पर्धा डोणगाव येथील क्रीडा मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 60 खेळाडूंनी सहभाग 4 संघाच्या माध्यमातून घेतला होता.अंतिम सामना K.D Riders व DS टायगर या संघात झाला.डीएस टायगरने केडी रायडर्स वर दणदणीत विजय मिळवला.
अंतिम सामन्यात डीएस टायगरने नाणेफेक जिंकून केडी रायडरला फलंदाजीचे निमंत्रण दिले. यामध्ये KD रायडर्सने सात षटकात 37 धावा केल्या. DS टायगरने हे धावांचे आव्हान केवळ पाच षटकांत पूर्ण केले. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार रोहन ढेपे यांना मिळाला.
त्यांनी अष्टपैलू कामगिरी करत 9 चेंडूमध्ये 21 धावा केल्या व दोन षटकांत 6 धावा देत दोन बळी मिळवले.
डी एस टायगर संघाने अंतिम विजेतेपद पटकावून चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अंपायर सोन्याबापु भोसले व गोपाळ दळवी, बाबाराज भोसले, नागेश कोकरे,अमित माने व अमर भवर यांनी सहकार्य केले.
या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना दीपक सुरवसे यांच्याकडून मोफत टीशर्ट देण्यात आले.
रोहन ढेपे बनला सर्वोत्कृष्ट खेळाडू…
रोहन ढेपे या खेळाडूने स्पर्धेतील सर्व बक्षिसे अर्थात स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन, गोलंदाजी व मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर कोरली. व कॉटर फायनल, सेमी फायनल, फायनल या तिन्ही सामन्याचे सामनावीर सुद्धा रोहन ढेपे हेच ठरले.त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.