Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर : उत्तर प्रदेशच्या चोरांनी सोलापुरातील महामार्गालगत असलेल्या सोसायटी, कॉलनीमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत हे हेरले. ही संधी साधून दिवसा ४ ठिकाणी घरफोडी केली. टोळी जेरबंद झाल्यानंतर तपासात ही माहिती समोर आली आहे.

सैफअली महम्मदअली सय्यद (२६, गुलावटी, बुलंदशहर), महम्मद मुबशीर अब्दुलअजीज शेखसिद्दकी ( ४३, गल्ली नंबर ४ मुस्तफाबाद, दिल्ली), महम्मद शकील नूरअहमद (४४, फरीदनगर, गाजियाबाद), तन्वीरअहमद जहीरअहमद अन्सारी (३२, बुलंदशहर, उत्तर प्रदेश ) यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे फौजदार शैलेश खेडकर व त्यांचे पथक जुना कारंबा नाका परिसरात पेट्रोलिंग करताना कार ( यूपी १३ ए. एन. ५४३८) थांबली होती. त्यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कारची पाहणी केली. त्यामध्ये कटावणी, स्क्रू ड्रायव्हर काही दागिने मिळाले. संशय आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. सोलापुरात अनेक ठिकाणी दिवसा घरफोडी केल्याचे समोर आले.

चौघांना १८ जानेवारी रोजी अटक करुन दिल्ली येथे नेऊन तपास केला. सात तोळे दागिने, २८ तोळे चांदीचे दागिने, पैसे, कार, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. चौघाजणांनी नवीन डीमार्ट परिसर, मड्डीवस्ती, अवंती नगर, जुना पुना नाका, माकणे अपार्टमेंट, शेळगी परिसर, द्वारका विहार, कमलश्री अपार्टमेंट या ठिकाणी रेकी केली होती.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा श्री. संजय सांळुखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक शैलेश खेडकर, पोहेकॉ/अशोक लोखंडे, इमाम इनामदार, बाबर कोतवाल, पोना/शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, संदिप जावळे, संतोष येळे, पोशि/ सुहास अर्जुन, स्वप्निल कसगावडे, कुमार शेळके व बाळकर यांनी केली आहे.

एक आठवणीतील तपास
दिवसा घरफोडी करणारे आरोपी
भर दिवसा येऊन हेरगिरी करून बंद घराचे लॉक तोडून चोरी करणारी टोळी.
घरफोडी चोरी झाली की, आपल्याला मुख्यता रात्री आरोपी येऊन घरफोडी करतात असे वाटते, पण ही टोळी फक्त दिवसा घरफोड्या करते. ज्या सोसायटी मध्ये वॉचमन नाहीत, अशा सोसायटी यांचे मुख्य टार्गेट असते.
सदर तपासातील मुख्य clue म्हणजे CCTV फुटेज.
घरफोडी घटनास्थळावरील तसेच जाण्यायेण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज चेक करून detection ची चिकाटी न सोडता, आम्ही सर्व clue तपासले, सर्वच clue येथे सांगता येणार नाहीत, पण त्यातून आम्हाला मिळणारी प्रत्येक पॉझिटिव्ह माहिती आम्ही पडताळून पाहिली, आणि आम्ही आरोपीस अटक करण्यात यशस्वी झालो.
दुसरे महत्वाचे काम होते, गुन्ह्यातील माल हस्तगत करणे, आम्ही तपास पथकाने सोलापूर पासून 1600 km दूर असलेले गाझियाबाद, उत्तरप्रदेश मध्ये जाऊन ते आव्हानही यशस्वी रित्या पेलले, आणि चार दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात यश आले.
खरोखर हा एक कौशल्यपूर्णरित्या केलेला आठवणीतील तपास आहे.


शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक ,

गुन्हे शाखा, सोलापूर शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *