शास्त्रीय संगीतातील एक तारा निखळला असून एक स्वर्गीय सूर शांत झाला आहे. पंडित जसराज यांच निधन झालेे आहे.
अमेरिकेतील न्यू जर्सी इथं पंडित जसराज यांच वृध्दापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.
मेवाती घरण्याचे अत्यंत प्रतिभावंत शास्त्रीय गायक जसराज यांच सर्वात मोठं आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गायकीतील ‘जसरंगी’ ही जुगलबंदी. मेल आणि फिमेल गायक हे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रागाचा अविष्कार सादर करताना प्रेक्षक मोहून जायचे.
सूर्यमालेतील मंगळ आणि गुरु यांच्या मध्ये असणाऱ्या एका लघु ग्रहाला पं. जसराज यांच नाव देण्यात आलं होतं. इतका मोठा सन्मान मिळविलेले ते एकमेव भारतीय आहेत.
पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला.पंडित हे गेल्या ऐंशी वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख आणि मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते .मेवाती घराण्याचे संबंध असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने स्वर्गीय सूर शांत झाला अशी प्रतिक्रिया गायन क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने शास्त्रीय गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे