‘सोलापूर पॅटर्न’ | सातारा,सांगली,कोल्हापूरमध्ये CEO स्वामींच्या कामाची दखल

Big 9 News Network

गाव कोरोनामुक्त अभियानाची दखल

सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले “ माझं गाव..कोरोनामुक्त गाव” या अभियानाची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली आहे. सिईओ स्वामी यांचा सोलापूर पॅटर्न आता सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयात राबविणेत येत आहे. कृतीशील असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आपल्या कामाची छाप प्रशासनावर पाडताना यशस्वी होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसून येत आहे.


कोल्हापूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये हा उपक्रम राबविणेसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यक्षेत्रातील १७८ महाविद्यालयात राबविणेत येत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी या गावामध्ये गाव दत्तक घेऊन जनजागृती करणार आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत 1028 ग्रामपंचायती मध्ये सिईओ दिलीप स्वामी यांनी माझं गाव कोरोनामुक्त हा हा उपक्रम सुरू केला.

व्यापक प्रमाणात जनजागृती करणेत आली. याचा परिणाम चांगला झाला. अनेक गावे कोरोना मुक्त झाली. चिंचणी सारख्या गावांच्या वेशीला देखील शिवू शकला नाही.
सिईओ स्वामी यांनी प्रत्येक गावासांठी पालक अधिकारी नेमून सुक्ष्म नियोजन केले होते. दुसरी लाट लक्षात घेता ग्रामीण भागात केलेल्या नियोजनामुळे लाखो लोकांना जीवदान मिळाले. कोविड सेंटर बरोबरच कोरोनाग्रस्त रूग्णांचे मनोबल उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचा डंका पश्चिम महाराष्ट्रात पोहचला असून कोल्हापूर येथील नावाजलेले छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर मोहिम आखल्याने या मोहिमेचे कौतुक होत आहे. सिईओ स्वामी यांनी ज्या पध्दतीने ताणतणावार ऑनलाईन द्वारे तसेच स्पीकर द्वारे तसेच व्हीडीओ या द्वारे जनजागृती व समुपदेशन केले त्याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे समुपदेशन देणेचे नियोजन केले आहे.