Positive Story | अश्विनी भोसले ठरल्या पहिल्या महिला ठाणे प्रभारी अधिकारी

BIG 9 NEWS NETWORK

शहरातील पोलिस दलात शुक्रवारी खळबळजनक घटना घडली. लाचखोरीमध्ये दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यामध्ये सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांच्यासह त्यांच्या ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साडेसात लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली.दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने सदर बझार पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्याकडे सलगर वस्ती पोलिस ठाण्याची सूत्रे सोपवली.

लाचखोरी घटनेने पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र दिसून आलं, दरम्यान एकाच ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व त्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक झाल्यानंतर त्या पोलिस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी लगेच सदर बजार पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्याकडे देण्याचा आदेश काढला.
सदर बजार पोलिस ठाणे अंतर्गत नियुक्ती झाल्यानंतर अश्विनी भोसले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केल्याचं दिसून आलं, सोलापूर शहरातील पोलीस ठाण्याला प्रथमच महिला ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून अश्विनी भोसले यांची सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली आहे.

आजवरच्या कालावधीत अनेक महिला अधिकारी यांनी सोलापुरात उत्तम प्रकारे काम करून प्रशंसा मिळवली होती. अनेक पोलिस उपायुक्त सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर सद्यस्थितीत महिला अधिकारी सक्षमतेने कार्यरत आहेत मात्र पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी महिला अधिकार्‍याची नियुक्ती झाली नव्हती. साधारण एक वर्षापूर्वी अश्विनी भोसले यांची सदर बाजार पोलिस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आता सोलापुरात प्रथमच पोलीस ठाण्याची महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पदभार घेतला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.