Big9news Network
उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग यांनी दिनांक 09 नोव्हेंबर 2021 अन्वये श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक शुध्द पंचमी दि. 09 नोव्हेंबर 2021 ते कार्तिक शुध्द पौर्णिमा 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. या कार्तिक वारीचा मुख्य दिवस हा दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. यात्रा कालावधीत पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्वाचे रस्त्यावर एकेरी वाहतूक व प्रवेश बंद करण्याची अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देत आहे, असे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी कळविले आहे.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांबाबत –
नगर ,बार्शी, सोलापूर,मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, (आहिल्यादेवी चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील. पुणे, सातारा,वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा, गाताडे प्लॉट पार्किंग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाऊस येथे पार्किग करतील. किंवा टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कूल मैदान येथे पार्किंग करतील.
शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतूकीबाबत –
टेंभूर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड करकंब चौक मार्गे जातील. पुणे, साताराकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्गे इच्छित स्थळी जातील. विजापूर ,कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज,मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नविन कराड नाका टाकळी बायपास मार्गाने इच्छित स्थळी जातील.
पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत –
दिनांक 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत संपुर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. महाव्दार चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी व वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सावरकर चौक ते शिवाजी चौक या मार्गावर वाहतूकीसाठी सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. बार्शी सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस टी बसेस यांना नविन पूल, जुना दगडी पूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते आर्बन बँक , सावरकर चौक ते आर्बन बँक, लहूजी वस्ताद चौक ते काळा मारूती चौक या मार्गावर सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था –
अहमदनगर , बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड ( अहिल्या चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील. तसेच नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी इसावा येथे पार्किंग करतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही वेअर हाऊस येथे पार्किंग करता जातील. कोल्हापूर , सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस किंवा टाकळी मार्गे टाकळी हायस्कूल येथील मैदानात पार्किंग करीता जातील. विजापूर मंगळवेढा कडून येणारी वाहने ही कासेगाव फाटा टाकळी मार्गे येवून वेअर हाऊस मध्ये पार्किंग करतील. यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे व संबंधित मठामध्ये पार्क होतील. व इतर वाहने ही जुन्या कराड नाक्या समोरील रेल्वे मैदान येथे पार्क करतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क होणार नाहीत.
शहराबाहेरून जाणाऱ्या वाहतूकीबाबत –
सोलापूर, बार्शी , नगरबाजूकडून नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून वेळापूर , अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा बाजूकडे जाणारी जड व अवजड वाहने त्यामध्ये ट्रक , डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, टँकर व गॅस टँकर सार्वजनिक वितरण व्यवस्था (शासकीय अन्नधान्य वाहतूकीची वाहने) , केरोसीन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी वाहने ट्रॅक्टर ट्रॉलीसह व उस वाहतूक करणारी वाहने वगळून या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा, अहिल्या चौक पंढरपूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग –
मोहोळ, कामती , मंगळवेढा, सांगोलामार्गे इच्छित स्थळी किंवा मोहोळ , शेटफळ, टेंभूर्णी, वेळापूर, साळमुक फाटा, महूद सांगोलामार्गे इच्छित स्थळी. विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातार,आटपाडी, पुणेबाजू कडून नियमित पणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून टेंभूर्णी , शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला बाजूकडे जाणारी जड अवजड वाहने त्यामध्ये ट्रक, डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर व ऊस वाहतूक करणारी वाहने वगळून या वाहनांना मोहोळ कुरूल फाटा , मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महूद फाटा, साळमुख फाटा, श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग –
कामती , मंगळवेढा, सांगोला, महूद, वेळापूर, अकलूज, टेंभूर्णी मार्गे इच्छित स्थळी किंवा महूद, सांगोला, मंगळवेढा, कामती, मोहोळमार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच दि.10 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्तिक वारी संपन्न होत असल्याने जड वाहतूकीच्या आदेशास कार्तिकवारी कालावधी पुरती तात्पुरती स्थगिती देण्यास येत असून पंढरपूर शहरातून जाणारी जड वाहतूक ही वरील जाहीरनाम्यातील नमूद ठिकाणावरून बंद करण्यात येत असून ही जड वाहतूक सुचविण्यात आलेल्या पर्यायी मार्गाने जातील. आणि कार्तिक वारीचा कालावधी संपताच 7/4/2021 रोजी देण्यात आलेला आदेश 24 तासाकरीता कायमपणे पूर्वीप्रमाणे अमलात राहील. तरी सदरचा आदेश दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वा. 01 मिनिट ते 19 नोव्हेंबर 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत अमलात राहील, असे आदेशात नमूद केलेले आहे.