Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूरमध्ये कत्तलीसाठी आणून दाबून ठेवलेले सुमारे गाय वंशीय 35 जनावरे सोडवण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणात माजी नगरसेवक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी पहाटे सहाच्या सुमारास पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बझार पोलिसाच्या पथकाने कारवाई केली.

शास्त्री नगर येथील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाडयात कत्तलीसाठी आणलेली 35 गोवंशीय जनावरे त्यामधे 18 खिल्लार गाई, 3 खिल्लार खोंडे, 1 गाईचे नुकतेच जन्मलेले 2/3 दिवसाचे वासरु, (त्यापैकी 3 गायी जखमी अवस्थेत असलेल्या), 13 जर्शी जातीच्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या गायी, असे एकूण 10,30,000 किंमतीची 35 गोवंशीय जनावरे मिळून आली. जनावरांची परिस्थिती पाहून पोलीस सुद्धा हळहळले पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी स्वतः या जनावरांची मदत करता औषधोपचार केला .ही सर्व जनावरे ताब्यात घेऊन त्यांना महानगरपालिका येथील कोंडवाडयाच्या गाड्या व मदतनीस यांचे मदतीने अहिंसा गोशाळा,जूना कारंबा नाका, खेड ,बार्शी रोड येथे नेऊन जमा केल्या आहेत.

याप्रकरणी इब्राहिम कुरेशी, आलम इब्राहिम कुरेशी, खाजा उर्फ काल्या मोहम्मद साब कुरेशी या इसमावर गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पो स ई मुकेश गायकवाड़, HC/नदाफ, HC /मडवली, PN भोई, PC दिंडोरे, व रात्रपाळीचे RCP पथक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *