Big9news Network
आज नूतन वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सोलापुरातील एका महिला चित्रकाराने गौतम बुद्धाचे पेन्सिल द्वारे चित्र रेखाटून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोलापुरातील पल्लवी स्वामी या गृहिणी असून निसर्ग,मानव, विविध देहबोली, विविध प्रसंगांची त्यांनी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. कुटुंब सांभाळत चित्रकलेचा छंद त्यांनी जोपासला आहे. येणाऱ्या काळात त्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन त्या भरवणार आहेत.
मागील साधारण दोन वर्ष हे कोरोनाच्या प्रभावाखाली होते. सद्यस्थितीत प्रादुर्भाव कमी असला तरी नव्या ओमायक्रोनमुळे भीतीचे सावट आहे. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे चित्र रेखाटन करून नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पल्लवी स्वामी
चित्रकार