Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

मागील दोन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध होत असून शुक्रवारी दोन लाख डोसेस प्राप्त होत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्राप्त झालेली लस एकाच दिवशी संपेल असे लसीकरणाचे सुयोग्य नियोजन आज पर्यंत केले आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन लसीकरणाचे काम व्यवस्थितरीत्या पार पाडले आहे.

निकषाप्रमाणे दिलेली लस त्वरित संपवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यास आज दोन लाख डोसेस मिळत आहेत. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून कुपनची व्यवस्था राबवल्यामुळे लसीकरणाच्या कामात सुसूत्रता आली.

उद्या शनिवारी संपूर्ण जिल्हाभर वॉक इन व्हॅक्सीनेशन मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांनी ऊद्या शनिवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे, तरी नागरीकांनी उद्याच्या मेगा लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले. या मेगा लसीकरण मोहिमेच्या नियोजनावर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष ठेवून आहेत. याकरिता शुक्रवारी दुपारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका समूह संघटक, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मार्गदर्शन करुन सुचना देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *