दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना सीना नदीत युवक वाहून गेला
मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारातील घटना; पोलिसांकडून दुपारपासून तरुणाचा शोध सुरू.
मोहोळ: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करत असताना एक युवक सीना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवार ११ सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या शिवारात घडली. सौरभ सुभाष बेंबगळे (वय १८ वर्षे, रा. लातूर) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सौरभ सुभाष बेंबगळे हा युवक मोहोळ येथील विषाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शनिवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कंपनीतील कामगार आष्टे गावच्या शिवारातील सीना नदी पात्रात गेले होते. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान गणपती विसर्जन करत असताना अचानक पणे पाय घसरल्याने सौरभ बेंबगळे याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. यावेळी त्याने पोहून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.