Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

​​​​​​​
​अनेक वर्षांनी स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण झाली – देवेंद्र फडणवीस

(प्रतिनिधी अक्कलकोट, दिनांक ८ नोव्हेंबर) – आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली असे मनोगत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलनदादा कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, प्रा. शिवशरण अचलेर, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रवी मलवे, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वटवृक्ष मंदिरात देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना महेश इंगळे, सचिन दादा कल्याणशेट्टी, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाष बापू देशमुख इत्यादी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *