Big9news Network
जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर खरीप हंगाम 2021 मध्ये पीक स्पर्धो राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगाम मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2021 पूर्वी तसेच इतर खरीप पिकासाठी भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल इत्यादी पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पूर्वी अर्ज सादर करावेत.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येत असल्याने उत्पादकतेमध्ये वाढ होत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढविण्यास मदत होईल. ते अधिक उमेदीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील, हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. सर्व पातळीवर एकदाच शेतकऱ्यांचा थेट सहभाग होण्यासाठी 300 रूपये चलनाद्वारे तालुका पातळीवर प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरुन उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार विविध पातळीवर निवड केली जाणार आहे.
विजेत्यासाठी बक्षिसांची स्वरुप खालीलप्रमाणे –