BIG 9 NEWS NETWORK
गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे व त्यांचे पथकातील पोलीस कर्मचारी यांना एका चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा व आरोपीचा शोध घेताना, पेट्रोलिंग करीत असताना, चोरलेली मोटार सायकल विक्रीसाठी घेऊन आसरा चौक मार्गे सोलापूर शहरात येथे येणार असल्याची गोपनीय खात्रीशीर बातमी मिळाली होती.
पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे व त्यांचे पथकातील कर्मचारी यांनी आसरा चौक येथे सापळा लावून रमेश रेवणसिध्द बळूरगी (वय २१ वर्षे रा.मु.पो. मंगरूळ ता. अक्कलकोट) जि. सोलापूर हा चोरीस गेलेली हिरो कंपनीची विनानंबरची, काळया रंगाची सिल्वर पट्टा असलेली मोटार सायकल घेऊन येत असताना दिसला. त्यास थांबवण्यासाठी पोलिसांनी इशारा केला असता तो मोटार सायकल सोडून पळून जाणेचा प्रयत्न करीत असताना मोठया शिफातीने त्यास ताब्यात घेतले गेले.
आरोपी रमेश रेवणसिध्द बळूरगी याने त्याचे साथीदार मंगेश राजु आंबेकर व नामदेव बबन चुनाडे दोघे रा. अनिल नगर, पंढरपुर यांचे मदतीने सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, कुर्डवाडी, पंढरपूर, पुणे, तुळजापुर, लोनंद, सासवड, सातारा अशा विविध जिल्हयातुन चोरी केलेल्या एकुण १८ मोटार सायकल उत्कृष्टपणे तपास करून मोठ्या शिताफिने हस्तगत केल्या आहेत. सदर आरोपीचा साथीदार मंगेश राजु आंबेकर यांस देखील अटक करण्यात आली आहे. आरोपी नामदेव बबन चुनाडे रा. अनिल नगर पंढरपुर हा फरार असुन गुन्हे शाखेकडुन आरोपीचा शोध सुरू आहे. सदर आरोपीकडुन आणखी काही चोरीच्या मोटार सायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, सोलापूर शहर श्री. अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्री. बापु बांगर, वपोनि (गुन्हे) श्री. संजय साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप शिंदे, पोह/अजय पाडवी, दिलीप किर्दक, पोना/अयाज बागलकोटे, संतोष येळे, पोकों/कृष्णात कोळी, पोकॉ. गणेश शिंदे, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, राजकुमार पवार कुमार शेळके, चापोना/संजय काकडे, विजय निंबाळकर यांनी पार पाडली.’
गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचेवतीने चोरीस गेलेल्या मोटार सायकल शोध घेणे बाबत राबविण्यात आलेल्या १० दिवसाचे मोहीमे अंतर्गत पोसई/संदिप शिंदे यांचे पथकाकडुन १८ मोटार सायकल, सपोनि/ सचिन बंडगर यांचे पथकाकडुन ०५ मोटार सायकल, सपोनि / संजय क्षिरसागर यांचे पथकाकडुन ०५ मोटार सायकल, सपोनि/निखील पवार यांचे पथकाकडुन ०१ व पोसई / शैलेश खेडकर यांचे पथकाडुन ०२ मोटार सायकल अशा चोरीस गेलेल्या एकुण ३१ मोटार सायकल (अंदाजे ११,६६,५००/-रू) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकुण १३ आरोपीना अटक करण्यात आली आहे.