Big9news Network
संशय अन् हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पती स्वप्निल वाले, दीर सिद्धाराम वाले यांची न्यायदंडाधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली.
स्वप्निलचा विवाह १५ एप्रिल २०१४ मध्ये झाला होता. लग्नानंतर पती, दीर आणि सासूंनी संगनमत करून हुंडा दिला नाही म्हणून तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवून छळ करु लागले.
या छळास कंटाळून पत्नीने पोलिसांमध्ये फिर्याद दिली. न्यायालयात अॅड. अभिजित इटकर यांनी आपल्या युक्तिवादात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.
या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. आरोपींच्या वतीने अॅड. अभिजित इटकर, अॅड. सुनील सुतार, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, ॲड. सुशीला कन्नूरकर यांनी काम पाहिले.
Leave a Reply