Big9news Network
विजापूर रोड वरील अशोक नगरातील शांतराज नेरसन इंडिगिरी (वय 30) या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला नातेवाइकाच्या मदतीने खाली उतरून बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित केले या घटनेची नोंद झाली आहे.