Big9news Network
सोलापूर विभागात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे पुणे-जबलपूर-पुणे विशेष एक्सप्रेसची मुदत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
- 1 ऑगस्टपर्यंत जबलपुर-पुणे विशेष एक्सप्रेस धावणार होती. आता ही गाडी 26 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. 2 ऑगस्टपर्यंत पुणे जबलपूर विशेष एक्सप्रेस धावणार होती. आता ही गाडी 27 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपला प्रवास सुनिश्चित करावा.