Big9news Network
बोटस्वानात १०९८ कॅरेटचा हिरा खाणीत सापडला असून तो जगातील तिसरा सर्वात मोठा असल्याचे मानले जाते. अँग्लो अमेरिकन डी बीअर्स आणि सरकार यांच्या संयुक्त उपक्रमातून हा हीरा हाती लागला असून तो बुधवारी बोटस्वानाचे अध्यक्ष मोकस्वित्सी मासिसी यांना दाखवण्यात आला. हिऱ्याची कंपनी डेबस्वानाने हा हिरा शोधल्यानंतर दोन आठवड्यांनी तो अध्यक्षांना दाखवला.
डेबस्वाना कंपनी ५० वर्षांपासून या व्यवसायात असून आतापर्यंत एवढा मोठा हिरा प्रथमच हाती लागला आहे, असे कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक ल्यानेत्ते आर्मस्ट्राँग म्हणाल्या.
हा हिरा ७३ मिलीमीटर लांब, ५२ मिलीमीटर रुंद आणि २७ मिलीमीटर जाड आहे. जगातील सर्वात मोठा दुसरा हिरा ‘लेसेडी ला रोना’ पेक्षा हा हिरा किंचित कमी जड आहे.
२०१५ मध्ये बोटस्वानातच लेसेडी ला रोना सापडला होता. सगळ्यात मोठा ३,१०६ कॅरेटचा हिरा (क्युल्लीनन स्टोन) १९०५ मध्ये दक्षिण अफ्रिकेत सापडला होता.
Leave a Reply