Big9news Network
कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला बिडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था,मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे गेल्या 18 वर्षापासून ही वसाहत अस्तित्वात आहे. या वसाहतीत साधारणता 50 हजारच्या घरात लोकसंख्या आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विडी व यंत्रमाग व असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत.
या कामगारांना आपली रोजीरोटी मिळवण्यासाठी दररोज किमान 10 ते 15 किलोमीटर पायपीट करावी लागते.रोजगाराची शास्वती नसते.घर प्रपंच चालवण्यासाठी उसने उधारी,कर्ज काढावे लागते.ही वस्तुस्थिती असताना या कामगारांना अवैध धंद्याचा विळखा बसला आहे.मटका,जुगार,विषारी ताडी, हातभट्टी दारू असे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत.
याबाबत सतत स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवून ही यावर आळा बसत नाही.यामुळे कामगारांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे.ही अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे.तरी तात्काळ यावर आळा घालण्यात यावे अन्यथा आम्हाला रस्त्यावरची आक्रमक लढाई करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संस्थेच्या सचिवा माजी नगरसेविका नसीम शेख यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आले.