Day: November 2, 2021

  • दिवाळीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू

    दिवाळीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू

    Big9news Network यावर्षी दीपावली उत्सव 2 ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजुनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करू नये, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. आदेशात म्हटले आहे की, उत्सव साजरा करताना नागरिकांनी…

  • कार्तिक वारी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आढावा

    कार्तिक वारी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आढावा

    Big9news Network कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबचा आढावा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज घेतला. कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा…

  • ग्रामसभेत मतदारयादीचे वाचन होणार – जिल्हाधिकारी

    ग्रामसभेत मतदारयादीचे वाचन होणार – जिल्हाधिकारी

    Big9news Network मतदारयादीची चाळणी करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी तालुकानिहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये मयत, स्थलांतरीत, आढळून न येणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन करून मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत निवडणूक…

  • विद्यापीठात इतिहास विभाग सुरू करण्यास मान्यता

    विद्यापीठात इतिहास विभाग सुरू करण्यास मान्यता

    Big9news Network सोलापूरच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वतंत्र इतिहास विभाग सुरू करण्यात येणार आहे. आमदार सुभाषबापू देशमुख यांनी सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मागणी केली होती आणि विविध स्तरावर तिचा पाठपुरावाही केला होता. त्या प्रयत्नाला यश आले आहे. या बद्दल विद्यापीठातल्या आणि विविध महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांनी आणि इतिहासप्रेमी नागरिकांंनी आमदारांचा सत्कार केला. सोलापुरात इतिहास…

  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; महापालिकेने केले शिबिराचे आयोजन

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; महापालिकेने केले शिबिराचे आयोजन

    Big9news Network सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आलेला होता. या सर्वेक्षणामध्ये एकूण 122 विशेष गरजा असणारी बालके आढळून आलेली होती. या बालकांचे निदान करून, तसेच त्यांना उपचार करून त्यांच्या गरजेनुरूप सेवा-सुविधांची निश्चिती करणे आणि त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या…

  • रोटरी कडून 25 शिक्षकांचा नेशन बिल्डर पुरस्काराने गौरव

    रोटरी कडून 25 शिक्षकांचा नेशन बिल्डर पुरस्काराने गौरव

    Big9news Network रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 25 शिक्षकांना नेशन बिल्डर हा पुरस्कार वालचंद कॉलेज समाजसेवा विभागाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला. मेसॉनिक हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमाला रोटरीचे अध्यक्ष संजय पटेल, माजी प्रांतपाल झुबीन अमारीया, कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते.…

  • वरद बाल रुग्णालयात हिमोफिलीया रूग्णांवर होणार मोफत उपचार

    वरद बाल रुग्णालयात हिमोफिलीया रूग्णांवर होणार मोफत उपचार

    Big9news Network डॉक्टरी पेशा हा केवळ व्यवसायासाठी नसून सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे या उद्देशाने डॉ. विक्रम दबडे यांनी अथक प्रयत्न करून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हिमोफिलीया रुग्णांसाठी मोफत उपचार करण्यासाठी दत्त चौकातील वरद बाल रुग्णालयात सेंटर सुरू केले असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांनी केले. मोफत हिमोफिलीया उपचार सेंटरचे उद्धाटन त्यांच्या…

  • ‘स्वामीं’चा नवोपक्रम | आता…जिल्हा परिषदेची ई- सेवापुस्तक प्रणाली राज्यभर

    ‘स्वामीं’चा नवोपक्रम | आता…जिल्हा परिषदेची ई- सेवापुस्तक प्रणाली राज्यभर

    Big9news Network सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन त्यांचे डिजिटलायझेशन केले व ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲपच्या माध्यमातून सेवा पुस्तक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात दिले आहे. आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या ॲपच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला त्यावेळी राजेश कुमार बोलत होते. पुढे बोलताना राजेश कुमार म्हणाले…

  • Morning Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

    Morning Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

    Breaking |माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक 100 कोटी वसुलीच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्याची मोठी बातमी  समोर आली आहे. तब्बल13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनेही मोठी कारवाई केली. सोमवारी सकाळपासून माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर देशमुखांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे .सेक्शन पी एम…