Big9news Network
सोलापूर शहर परिसरात आज एकाच दिवशी 74 जणांची कोरोना बाधित असल्याची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 134 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 8 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.
लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.तर जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.20 मे रोजी कोरोनाचे नवे 74 रुग्ण आढळले असून यामध्ये 41 पुरुष तर 33 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 3006 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2594 निगेटिव्ह तर 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 134 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.