Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

रोटरी क्लब सोलापूरचे माजी अध्यक्ष स्व. बंडप्पा बाबुराव फुंडीपल्ले यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उमाशंकर व नातू सौरभ फुंडीपल्ले यांनी महानगरपालिकेस ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन दिली. आज मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे ही मशीन सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, रोटरी क्लब आॕफ नाॕर्थच्या अध्यक्षा पूनम देवदास, सचिव अर्जुन अष्टगी,
हिरालाल डागा, सुधीर मद्दी, गणेश धोतरे, सिध्दाराम खजुरगी, गणेश आडम, नारायण सिंधी, सूरज देवदास, साहिल करकमकर, पवन अग्रवाल, प्रमोद माढेकर आदी उपस्थित होते.

बंडप्पा फुंडीपल्ले हे MIDC चे माजी अध्यक्ष तथा विविध शैक्षणिक संस्था व चेंबरचे आॕफ कॉमर्सचे सदस्य होते. शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत ते विविध समाजोपयोगी कार्यात अग्रेसर रहायचे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत फुंडीपल्ले परिवाराने कोवीड विरुध्दच्या लढ्यात हा खारीचा वाटा उचलल्याची भावना उमाशंकर फुंडीपल्ले यांनी मांडली.

दानशूर मंडळींने पुढे यावे – आयुक्त

रोटरी क्लब आॕफ नॉर्थ सोलापूर व फुंडीपल्ले परिवाराचे कौतुक करत आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले की, समाजातील दानशूर व्यक्तींसह सामाजिक संघटनांनी पुढे येऊन अशी मदत केल्यास रुग्णांना अधिक चांगले उपचार देण्यास मदत होईल. यथाशक्ति मदत करण्यास इतरांनीही पुढाकार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *